लोकसभेच्या निवडणुकीतलं आज पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे. यात विदर्भातल्या सात जागांवर मतदान होत आहे. तर देशातल्या 20 राज्यांमध्ये एकूण 91 मतदारसंघात मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहीर या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद होईल.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज रायबरेलीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील.

माओवाद्यांच्या हल्ल्यांची भीती लक्षात घेऊन गडचिरोलीत कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी हेलिकॉप्टरही तैनात ठेवलं असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आज अमेठीमधून आपला उमेदावारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी भाजपचे वरिष्ठ नेते  उपस्थित राहणार असून भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज बिहारमध्ये एक आणि आसाममध्ये दोन जाहीर सभा आहेत. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours