सांगली, 15 एप्रिल : मागील काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले माजी आमदार संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आल आहे.  संभाजी पवार यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिष्टाई केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता संभाजी पवार यांची नाराजी झाली आहे. संभाजी पवार यांच्या पाठिंब्यामुळे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांची ताकत वाढण्यास  मदत होणार आहे.
संभाजी पवार यांचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशी मोठ्या प्रमाणावर मतभेद झाले होते. मध्यंतरी संभाजी पवार यांनी थेट संजयकाका पाटील यांच्यावर टीकादेखील केली होती. त्यामुळे या मतभेदाचे पडसाद शहराच्या राजकारणत दिसून आले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours