मुंबई, 15 एप्रिल : जम्मू-काश्मीरकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात 15 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. राजस्थानजवळील चक्रीय वात स्थितीमुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मुंबईतही तुरळक पावसाची शक्यता आहे.पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण, जोरदार अवकाळी पाऊस, गारा पडणे अशा घटना घडत आहेत. 13 आणि १४ एप्रिल रोजी अंबरनाथ, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, नाशिकमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली होती. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर शेतकऱ्यांना मात्र जोरदार फटका बसला आहे. चिकू, आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. असाच अवकाळी पाऊस होत राहिला तर शेतकऱ्यांचा हातातोंडीशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours