नाशिक, 15 एप्रिल : प्रसिद्धीची एकही संधी न सोडण्याचा हव्यास काही लोकांना असतो. नाशिकलाही काही युवकांनी एक असाच स्टंट केलाय. जळगावमधील अंमळनेर इथं भाजपच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पक्षांतर्गत वादावादीमुळे राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना भांडण सोडवताना धक्काबुक्की झाली. त्यामुळे नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठवला आहे.
नाशिकमधील युवकांनी गिरीश महाजन यांना बाम आणि मलम तर पाठवलाच पण त्यासोबतच 'लवकर बरे व्हा, पण नाशिकच्या सेवेत रूजू व्हा' असा उपरोधिक सल्लाही दिला आहे. या सर्व प्रकाराची आता मोठी चर्चा होत असल्याचं दिसत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours