गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियात झालेल्या सभेतही राष्ट्रवादीला टार्गेट केलं. मोदींची ही महाराष्ट्रातली दुसरी सभा होती. या आधी वर्ध्यात झालेल्या सभेत त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादींच्या मोठ्या नेत्यांची सध्या झोप उडाली आहे. कारण त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती आहे असं मोदी म्हणाले. मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलेला हा इशाराच आहे असं समजलं जातं आहे.
मोदी म्हणाले, राष्ट्रवादींच्या नेत्यांची झोप सध्या उडाली आहे. याचं कारण मी सांगणार नाही. मात्र तिहारमध्ये जे लोक अडकले आहेत त्यांच्यामुळे त्यांची झोप उडालीय. त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटतेय असंही मोदी म्हणाले.
मोदींच्या या भाषणानंतर राष्ट्रवादीचे ते नेते कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours