मुंबई, 4 एप्रिल : गोंदियातील प्रचार सभेत PM नरेंद्र मोदींनी प्रफुल्ल पटेलांवर केलल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी सडकून प्रतिउत्तर दिलं आहे. ''चंद्रकांत पाटील आणि मोदींमध्ये काहीच फरक नाही. हे दोघेही फक्त घाबरवण्याचं काम करत आहेत. अटकेला घाबरून पळवणाऱ्यांची तुमची जात, आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात जेवढे माफीनामे आहेत ते सर्वजण तुमचे नातेवाईक आहेत'', असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ''उगाच हवेत बाण मारून कशाला घाबरवता, पाच वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. अटक करायला तुम्हाला कोणी अडवलं होत का? बालाकोट, पुलवामा आणि सॅटेलाईट हे तीन विषय बाजुला काढले तर मोदींकडे मुद्देच नाहीत. पाच वर्षांपूर्वी दिलेले कोणतंच आश्वासन पंतप्रधानांनी पूर्ण केलेलं नाही'', असंही आव्हाड म्हणाले. ''ज्या अपेक्षेनं 2014 मध्ये लोकांनी तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं त्या अपेक्षांचा स्वप्नांचा चुराडा होताना लोकं बघताहेत. रोजगार आणि शेतकरी समस्यांवर बोला '' असंही ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours