शिरूर, 3 मे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा इथं भीमा नदीत बुडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी गेलेल्या नागेश गायकवाड याचा मृतदेह नदीतच्या काढावर आढळल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
नागेश हा पोहण्यासाठी भीमा नदीत गेला होता. पण बऱ्याच काळ तो घरी परत न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केला. त्यानंतर नदीच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळून आला.
नदीत बुडून मृत्यू झालेल्या नागेश गायकवायड याची आई गतीमंद असून वडील अंध आहेत. त्यामुळे नागेशच्या अशा दुर्दैवी मृत्यूने त्याच्या आई- वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायकवाड दाम्पत्याचा एकमेव आधार असलेला मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours