मुंबई, 02 मे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक चर्चा कोणाची झाली असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची होय. लोकसभा निवडणूक न लढवता राज यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा एक भाग असेल असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. अर्थात राज यांनी त्याआधीच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. राज्यात या वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडूनच अशी माहिती मिळाली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours