हैदराबाद, 26 जून: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रोड्डी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांच्या प्रजा वेदिका या इमारतीवर बुलडोझर चालवला. मंगळवारी रात्री प्रशासनाने प्रजा वेदिका पाडण्यास सुरुवात केली. त्याआधी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची दोन दिवस बैठक झाली होती. प्रशासनाने इमारतीतील फर्नीचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे हटवली होती. सरकारच्या या कारवाईचा विरोध करण्यासाठी तेलगू देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी एक मोठी तुकडी या परिसरात तैनात केली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलुगु देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत देखील कपात करण्यात आली आहे. नायडूंचा मुलगा नारा लोकेश यांची झेड श्रेणीची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री लोकेश यांची सुरक्षा 55 वरून 22 अशी करण्यात आली आहे. नायडू काही दिवसांपूर्वीच सहकुटुंब सुट्टीसाठी परदेशात गेले होते. मंगळवारी रात्रीच ते प्रजा वेदिका या आपल्या निवासस्थानी परत येणार होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours