पुणे : मान्सून आज खऱ्याअर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालाय. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिलीय. यावेळी मान्सून वायू चक्रीवादळामुळे तब्बल 15 दिवस उशिराने दाखल झाल्याने बळीराजा चिंतेत होता. अखेर गेल्या 20 तारखेला मान्सून तळकोकणात दाखल झाला आणि त्यानंतर पुढच्या पाच दिवसात नियोजित वेळेनुसार संपूर्ण महाराष्टात मान्सून सक्रिय झालाय. पुढचे दोन दिवस मान्सून आपला पहिला स्पेल पूर्ण करेल त्यानंतर थोडीसी उसंत घेऊन राज्यभर पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईत सक्रिय
मुंबईकरांना आस लागून राहिलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. राज्यतील इतर भागांमध्ये मान्सून सक्रीय झाल्यानंतर मुंबईकरांना मात्र मान्सूनची प्रतिक्षा होती. पण, आता मुंबईकरांची मान्सूनची प्रतिक्षा संपली असून मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पावसाअभावी सध्या मुंबईकर उकड्यानं देखील हैराण आहेत. शिवाय, पाणी कपातीचा देखील मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे. पण, मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिल्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट देखील लवकरच टळण्याची शक्यता आहे. तसंच उकाड्यानं हैराण मुंबईकरांचे डोळे देखील पावसाकडे लागून राहिले आहेत. पण, आता लवकरच दिलासा मिळणार आहे. जूनचे तीन आठवडे हे कोरडेच गेले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours