बीड, 16 जून- गरिबीच्या नैराश्येतून 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना वडवणी तालुक्यातील परडी माटेगांव येथे सकाळी उघडकीस आली. संतोष अंगद कदम असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
दारिद्रय, शिक्षण शिकावे म्हटलं तर पैसा नाही आणि पैसा कमावावं म्हटलं तर हाताला काम नाही, घरात काय खावं यांची पंचाईत या कारणांमुळे या तरुणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे नातेवाईक सांगत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परडी माटेगांव येथील अंगद कदम यांचा एकुलता एक मुलगा संतोषने मध्यरात्री गावाशेजारील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
संतोष हुशार आणि प्रमाणिक तरुण होता, असे गावातील लोक सांगता आहेत. संतोष आणि त्यांचे आई-वडील हे बीड येथील एका तेल मिलमध्ये रोजंदारीवर काम करत होते. गेल्या दोन तीन दिवसांपासून ते परडी माटेगांव येथे आले होते. परंतु गावी आल्यापासून संतोष कदम हा अस्वस्थ होता. शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. परंतु घरात अठराविश्व दारिद्रय, शिक्षण घ्यावे म्हटले तर पैसा नाही आणि पैसा कमावाव म्हटलं तर हाताला काम नाही. यातून आलेल्या नैराश्यपोटी संतोषने मध्यरात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वडवणी पोलिस अधिक तपास करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours