औरंगाबाद, 16 जून: आज (16 जून)वटपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार, या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळो, अशी मनोकामना परमेश्वराकडे करतात. मात्र, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मीही अशी बायको देऊ नको, अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादेतील वाळूज परिसरात वटसावित्री साजरी केली. पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या. यमराजाकडे आपले मनोगत व्यक्त केले. सरकारने पुरुषांच्या हक्कासाठी कायद्यात बदल करावा, अशी मागणी आंदोनकर्त्यांनी यावेळी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours