औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभव पचवणं अवघड जातंय. पराभवाच्या धक्क्यातून ते अजुनही सावरू शकले नाहीत. मी कायम शिवसेनेसाठी आणि लोकांसाठी काम केलं. ही माझी शेवटची निवडणूक होती. हा पराभव बघावा लागणं हे क्लेशकारक आहे. हा पराभव पाहाण्याआधी मला मरण का आलं नाही असे भावनिक उद्गगार त्यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना काढले.
खैरे म्हणाले, मी ही शेवटची निवडणूक लढवणार होतो आणि नंतर देशभर शिवसेनेचा प्रचारक म्हणून फिरणार होतो. हे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सांगितलं होतं. मी कायम लोकांसाठी राबलो. बंगला, घर, फॉर्म हाऊस अशी संपत्ती गोळा केली नाही. फक्त शिवसेना आणि हिंदू बांधवांसाठी आणि जे सोबत आले अशा सगळ्यांसाठी काम केलं असं असतानाही पराभव पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग माझ्यावर आला असं भावनिक होत त्यांनी शिवसैनिकांसमोर आपलं दु:ख व्यक्त केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours