पुणे, 9 जून : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर पुण्याहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला आहे. बस क्रमांक MH 14 BT 4687 या बसला कामशेत बोगद्यात अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात शनिवारी (8 जून) रात्री उशिरा झालेला आहे. या धडकेनंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस बोगद्यातील दगडांवर आदळली. यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत बसमधील पाच पुरुष प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये बस चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. उपचारासाठी सर्व जखमींना तळेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेस-वेवरील सीसीटीव्हीच्या आधारे बसला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध महामार्ग पोलीस घेत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours