मुंबई, 8 जून : SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.  या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचंही लक्ष लागलं आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवरून जाहीर होईल.  दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.  गेल्या काही दिवसांपासून दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याबद्दल वेगवेगळ्या तारखा चर्चेत होत्या. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण शुक्रवारी (7 जून) अखेर एसएससी बोर्डानेच निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली.

दरम्यान,  या वर्षी बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली. मुलांचा निकाल 82.40 टक्के तर मुलींचा निकाल 90.25 टक्के असा लागला आहे. यंदा 12 वीचा सर्वाधिक निकाल बोर्डाच्या कोकण विभागाचा लागला. कोकणचा निकाल 93. 23 टक्के तर सर्वांत कमी 82.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours