मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे वेगवेगळे सूर या दोनही पक्षात ऐकू येत आहेत. काँग्रेसच्या बैठकीत काही नेत्यांनी वेगळं लढलं पाहिजे असा सूर लावला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. जे असं मत व्यक्त करतात त्यांच्या मताला काहीही किंमत नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, आम्ही काँग्रेसला मदत केली हे त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना विचारा. एकत्रच राहील पाहिजे त्यातच दोघांचंही भलं आहे. काँग्रेसने काय चर्चा करावी हा काँग्रेसचा विषय आहे. पण बैठकीनंतर असेच लोक बोलतात की जे कुठे नगरपालिके मध्येही निवडून येणार नाहीत. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours