मुंबई, 8 जून: उकाड्यानं, पाणीटंचाईनं आणि दुष्काळानं हैराण झालेल्या सगळ्यांनाच दिलासा देणारा पाऊस आज केरळमध्ये अवघ्या काही तासांमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली तर काही भागांत पावसाच्या तुरळक सरी दोन दिवस आल्या. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आज वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची चिन्ह असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours