मुंबई, 6 ऑगस्ट- बेस्ट कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठ मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र, संध्याकाळ प्रशासन आणि कामगार संघटनांच्या बैठकीनंतर 20 ऑगस्टपर्यंत संप स्थगित करण्यात आला आहे. प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत मागितली आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला कामगारांनी संपाचा इशारा देऊन मोठा झटका दिला आहे.
मुंबईकरांना जानेवारीत सोसावा लागला होता त्रास..
निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, वेतन करार संपल्याने पुन्हा करार करणे, घरांचा प्रश्न आणि सामंजस्य करार आदी प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जानेवारीत काही कामगार संघटनांनी जवळपास नऊ दिवस संप केला होता. त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. प्रशासनाने त्यावेळी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण होऊ न शकल्याने पुन्हा संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे
बेस्ट वर्कर्स युनियनच्या मुख्य मागण्या...
-बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार त्वरित व्हावा, जो 31 मार्च 2016 सालीच संपला आहे.
-बेस्टचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलिनीकरणाचा निर्णय त्वरित लागू व्हावा.
-2016 ते 2018 या वर्षातील बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात यावा.
-कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.
-अनुकंपा भरती सुरू करा.
-2007 पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7930 रुपयांच्या मास्टर ग्रेडमध्ये अरिअर्ससह वेतन निश्चिती करावी.
...अन्यथा तलवारींचा वापर करा
बेस्टचा आजचा संप फोडण्यासाठी आता वादग्रस्त विधानाची भर पडल्याचे समोर आले. संप फोडण्यासाठी तलवारीच्या वापर करण्याचे आवाहन करणारे शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचे भाषण व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता बेस्ट वर्कर्स युनियनच्या संपाला पाठिंबा देणारे आणि बेस्ट कामगार सेनेचे समर्थक यांच्यात वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours