मुंबई, 07 ऑगस्ट : गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता एनडीआरएफची टीम अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. अशात ठाणे, रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रेदश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पुढच्या काही दिवस कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अनेक गावांना आणि शहरांना सतर्कतेचा उशारा देण्यात आला आहे.
पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण, कर्नाटकच्या किनारी भागात, राजस्थान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर मुसळधार पावसामुळे कोकणातला पूर अद्याप कमी झालेला नाही. जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली असली तरी राजापूर शहरात अजूनही पाणी भरलेलं आहे. सिंधुदुर्गातही मसुरे गावात पाणी भरलं आहे. हायवेवर अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तर रायगडमध्ये महाड शहराला महापुराचा विळखा पडला आहे. महाड-पुणे रस्त्यावरील वरंध घाटामध्ये माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्याप या ठिकाणी जेसीबी पाठवण्यात आला नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours