जळगाव, 31 ऑगस्ट : जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सर्व 48 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. सर्व संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी हे आदेश दिले आहेत. माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्ष कारावास आणि 100 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे तर प्रदीप रायसोनी 7 वर्ष शिक्षा आणि 10 लाख दंड, राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी यांना 7 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 40 कोटींपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे.
राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल आज लागला आहे. धुळे जिल्हा न्यायालयात विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ या हा निकाल दिला आहे. या निकालात माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भविष्याचा फैसला झाला आहे. एकूण 47 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे.
या प्रकरणात सुरुवातीला 57 संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 48 संशयितांबाबत हा निकाल देण्यात आला आहे. सर्व संशयित आणि त्यांच्या वकीलांना न्यायालयात हजर राहण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. धुळे न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?
'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours