मुंबई, 03 सप्टेंबर : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी वरुण राजाने राज्यभरात तुफान हजेरी लावली आहे. मुंबई, उपनगरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसईला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. सोमवारी रात्रीदेखील पावसाने उघडीप ने घेतल्यामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अंधेरी, मिरारोड, वसई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत पावसाचा जोर जास्त होता. पुढील 48 तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईमध्ये अनेक उपनगरांमध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. नवी मुंबईतदेखील मुसळधार पाऊस आहे. ऐरोली पुलाजवळ पावसामुळे पाणी साचलं आहे. वसई-विरारमध्ये पावसाने कालपासून जोरदार हजेरी लावली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास वसई विरारमध्ये सखल भागात पाणी साचून गणेश मंडपात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सावधान! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा
त्रीपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून दमदार हजेरी लावली. पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस असल्यानं मच्छीमारांना आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.
मंगळवारी दीड दिवसाच्या घरगुती गणपती बप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. पहाटेपासून पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान पाऊसाचा जोर कमी व्हावा यासाठी भाविक गणरायाकडे प्रार्थना करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours