( ड्रायव्हर डे च्या दिवशी ९० ते १०० ड्रायव्हर यांनी घेतला मोफत   चिकित्सा तपासणि शिविर चा लाभ)
 जिल्हा प्रतिनिधि शमीम आकबानी
लाखनी-- इंडियन ऑईल कारपोरेशन तर्फे दरवर्षि 'ड्रायव्हर डे '  साजरा करून या वर्षी सुद्धा ट्रक ड्रायव्हर यांच्या करिता मोफत चिकित्सा तपासणि शिविर   आयोजित केली गेली असुन मानेगांव येथील सुविधा सर्वो सेंटर येथे ता.१८-९-२०१९ रोजी ड्रायव्हर डे निमित्ताने सर्व ड्रायव्हर बाएं करिता ही मोफत चिकित्सा तपासणि शिविर आयोजित केली गेली होती.
---- या मोफत चिकित्सा तपासणि शिविर मधे नेत्र चिकित्सक,रक्त तपासणि चिकित्सक यांनी 'सेवामोह कंपनी अंतर्गत'  आपली सेवा प्रदान केली असुन त्या मधे डॉ.अमोल देशमुख (अकोला) रक्ततपासणी,डॉ.ए.के.सरकार , डॉ.राजीव मॅसी (नेत्र चिकित्सक), डॉ.संजोग ठाकुर (G.N.M.) लॅब असिस्टेंट, या डॉक्टरां कडुन ९० ते १०० ड्रायव्हर रूग्णांची तपासणि केली गेली असुन या मोफत चिकित्सा तपासणि शिविर मधे ५० रूग्णांची नेत्र तपासणि करुन  त्यांना मोफत चश्मे प्रदान करण्यात आले.व काहींची रक्त तपासणि करुन योग्य तो उपचार करण्यात आला.या मोफत चिकित्सा तपासणि शिविर मधे I.O.C.L.चे फ्लिट अधिकारी सचीन जी वैरागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते।
---- इंडियन ऑईल कारपोरेशन च्या वतिने 'ड्रायव्हर डे' च्या निमित्ताने सर्व ड्रायव्हर करिता मोफत चिकित्सा तपासणि शिविर मोहिम राबविण्यात आली असुन या शिविर मधे आपली सेवा प्रदान करणाऱ्या डॉक्टरांचे व त्यांची टीम चे विशेष आभार सुविधा सर्वो सेंटर चे शेषराव भाऊ वंजारी व रियाज (राजु) आकबानी यांनी व्यक्त केले आहे। 




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours