मुंबई 28 सप्टेंबर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप आलाय. दादांचा हा निर्णय पक्षात कुणालाही माहित नव्हता. राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि प्रवक्ते यांनाही माध्यमातूनच ही माहिती कळाली असं त्यांनीच सांगितलंय. त्यामुळे दादा नेमके कुठे गेले याची जोरदार चर्चा सुरू झालीय. गेल्या दोन दिवसांपासून दादा एकांतातच आहेत. EDने गुन्हा नोंदविल्यानंतर शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र अजित पवार फारसे बोलले नाहीत. राजीनाम्याचं वृत्त आल्यानंतर सर्वच नेते अजित पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र दादांचा फोन बंद आहेत. त्याचबरोबर दादांच्या सर्व पीएचे फोन्सही बंद आहेत.
खुद्द पार्थ पवार यांनी माध्यमांना माहिती देताना अजित पवारांचा निर्णय आधी माहित नसल्याचं सांगितलं. त्याचबरोबर दादा नेमकं कुठे आहेत हेही माहित नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे दादांच्या राजीनाम्याचं गूढ वाढलं आहे. आपल्या राजीनाम्याची बातमी बाहेर आल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटतील याची दादांना जाणीव होती त्यामुळेच त्यांनी आपले फोन बंद केले असावेत अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.
तासाभरापूर्वी अजित पवारांनी एक ट्विट करून शरद पवारांना पाठिंबा दिला होता. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आज,मुंबईत आदरणीय शरद पवार साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर, दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours