(शेतीच्या कामासाठी हमीपत्रावर दिले होते गौवंश)
लाखनी प्रतिनीधी: संदीप क्षिरसागर
लाखनी:---- लाखनी पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहिती आधारे ता.२२-९-२०१९ रोजी मातोश्री गौरक्षण (रेंगेपार कोहळी) येथुन अवैध जनावरांची वाहतुक होत असल्याची माहिती लाखनी पोलिसांना मिळाली होती.या प्रकरणी पोलिस निरीक्षक यांनी सापळा रचुन आरोपी राजेश सार्वे रा.रेंगेपार,निलेश तरोणे,व हेमंत भेंडे,रा.पिंपळगाव,व यादोंराव कापगते यांच्या विरुद्ध कार्रवाई करुन लाखनी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता।

 ...हा तर मला फसविण्याचा षड्यंत्र: यादोंराव कापगते 
------ मातोश्री गौसरंक्षण चे संस्थापक अध्यक्ष यादोराव कापगते यांनी विरोधक विनायक मुंगमोडे यांच्यावर आरोप लावुन मला फसविण्याचा षड्यंत्र रचवुण माझ्यावर गुन्हा नोंदविल्याचा आरोप केला आहे.त्यांचा गौशाळे मधे काम करणारे शेतकरी हेमंत भेंडे,निलेश तरोणे यांना त्यांचा शेतीसाठी उपयोगी असलेले जनावर त्यांचा जनावर मागणीच्या प्रलंबित असलेल्या अर्जावर देण्यात आले होते.संस्थेअंतर्गत काही सभासदांच्या उपस्थितीत सदर अर्जावर विचार करुन ठराव घेऊन सर्वानुमते तो मंजुर करून हमीपत्राच्या आधारावर त्यांना शेतीसाठी उपयोगी असलेले जनावर त्यांना देण्यात आले होते.त्याची प्रत सुद्धा कार्रवाई दरम्यान त्यांनी दीली होती पण पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही चौकशी न करता माझ्यावर व जनावरांची मागणी केलेल्या शेतकऱ्यांवर तस्करी चा गुन्हा दाखल केल्याचे यादोराव कापगते यांनी सांगितले।
विडियो - 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours