पुणे, 09 ऑक्टोबर : सध्या राज्यात निवडणुकांचं वार वाहत आहे. प्रत्येक पक्षात आता प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. पुण्यादेखील आज राजगर्जना होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ पुण्यातून फोडणार आहेत. त्यामुळे आजच्या प्रचारसभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मनसेचे एकमेव स्टार प्रचारक मुलुख मैदानी तोफेला सरस्वती मंदिर शाळेचे मैदान मिळालं खरं पण परतीच्या पावसाचं सावट सभेवर असेल अशी चर्चा आहे.
कसबा गणपतीचं दर्शन घेऊन राज ठाकरे संध्याकाळी भाषण करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुण्यात कसब्यातून मनसेचे अजय शिंदे यांनी भाजपच्या मुक्ता टिळक यांना आव्हान दिलं आहे. इथं शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली आहे तर काँग्रेसचे अरविंद शिंदे देखील मैदानात आहेत. गिरीश बापट खासदार होऊन दिल्लीत गेले आता महापौर मुक्ता टिळक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
भाजपसाठी कसब्याची लढत प्रतिष्ठेची असणार आहे. कसबा मतदार संघातून राज यांची तोफ धडाडेल तर कोथरुडमधून मनसेचे किशोर शिंदे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांची एकास एक लढत होणार आहे. इथं काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला पाठिंबा दिला आहे. यामुळे राज यांच्या रडारवर चंद्रकांत पाटीलही असणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours