मुंबई, 23 मार्च : कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू आहे. जगभरात 13 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात 24 तासांत तब्बल 15 रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 396 वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत देशभरात 80 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनानं दुसरा बळी घेतला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 63 वर्षीय व्यक्तीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours