मुंबई, 23 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान घातले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. मुंबईत आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 68 वर्षीय परदेशी नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
68 वर्षीय Philippines नागरिकाला 13 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे संसर्ग आढळून आल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, त्याच्या प्रकृतीत सुधार झाला होता. कस्तुरबामध्ये उपचार घेतल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. या रुग्णाला मधुमेह आणि अस्थमाचाही त्रास होता. अखेर रविवारी रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूचा आकडा मुंबईत 3 वर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे हा 8 वा बळी आहे.
तर दुसरीकडे, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 15 रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. मागील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 396 वर पोहोचली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यामध्ये कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours