अहमदनगर: चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे. याचा फटका इराणमधून आलेल्या 22 भाविकांना बसला आहे. अहमदनगरमध्ये गेल्या महिन्यात अवतार मेहेरबाबा यांच्या अमरतिथी दर्शनासाठी 22 इराणी आणि जपानी नागरिक आले होते. आता कोरोना व्हायरसमुळे ते अहमदनगरमध्येच अडकून पडले आहे. त्यांच्याजवळचे पैसे संपल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
अवतार मेहेरबाबा यांच्या दर्शनासाठी आलेले हे विदेशी भाविक मागील दोन महिन्यांपासून अहमदनगरमध्ये आहे. दरम्यान त्यांना या महिन्यात आपल्या गावी म्हणजेच इराण आणि जपानला जायचं होतं. मात्र, कोरोना व्हायरसमुळे त्यांची फ्लाईट्स आणि व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या भाविकांची चांगलीच गोची झाली आहे. या भाविकांकडे असलेले पुरेसे पैसे देखील संपले आहेत. अहमदनगर जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना अडचण निर्माण होत असल्याची तक्रार मेहेराबाद येथील नागरिकांनी बोलवून दाखवली आहे.
व्हिसा जोपर्यंत असतो तोपर्यंत संबंधित मेहेराबाद मंदिर प्रशासन यांची मदत करत असते. मात्र, आता व्हिसा संपला असून जिल्हा प्रशासन या विदेशी भाविकांकडे लक्ष देत नाही, तरी मंदिर प्रशासनाने त्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिले आहे. मेहेराबाद येथील काही सामाजिक संस्था त्यांना किराणा उपलब्ध करून देत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांना मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंमुळे तरी हे भाविक स्वःत आपल्या हाताने अन्न तयार करून खात आहे.
कोरोनामुळे आमचं जणजीवन विस्कळीत झालं आहे. आम्हांला आमच्या गावी जाता येत नाही, आम्ही येथे येताना जेवढे दिवस राहायचं होत तेवढेच पैसे आणले होते. मात्र, आता आमचे पैसे देखील संपले आहे. आमचा व्हिसा, फ्लाईट रद्द झाल्यामुळे आम्ही आमच्या देशात जाऊ शकत नाही, त्यामुळे अडचण झाली असल्याची खतं या विदेशी भाविकांनी मांडली आहे. आता जिल्हा प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours