पुणे, 17 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये असल्याने पुण्यात खबरदारीचा इशारा म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित16 रुग्णांची प्रकृती स्थिर असून 27 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचं अहवालात समोर आलं आहे. पण रुग्णांचा वाढता आकडा पाहता पुण्यात बाजारपेठांसह सगळी महत्त्वाची ठिकाणी बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद राहणार आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही.
आजपासून पुण्यात या गोष्टींवर आहे बंदी
- तुळशीबाग पाठोपाठ सुप्रसिद्ध हॉंगकॉंग लेन शॉपिंग ही 3 दिवस बंद राहणार आहे.
- सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढं ढकलल्या
- ग्रामदैवत कसबा गणपतीचंही दर्शन बंद
- कोर्टाचे काम फक्त 11 ते 2 असं 3 तास चालणार
Post A Comment:
0 comments so far,add yours