मुंबई, 11 एप्रिल : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनाग्रस्तांची (Covid - 19) सर्वाधिक संख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई - पुण्यात तर कोरोनाने कहर केला आहे. ही संख्या इतक्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1574 पर्यंत पोहोचली असून मृत्यूंचा आकडा 110 पर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1008 पर्यंत पोहोचली आहे. त्यातही पुण्यात 254, कोल्हापूर 37, अकोला 34 आणि नागपूरात 26 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार सध्या राज्याची संख्या 1574पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असून वेळीत नागरिकांनी सावध राहणं आवश्यक आहे. अन्यथा हा आकडा कैक पटीने अधिक वाढू शकतो.
सगळ्यात जास्त बाधित रुग्ण मुंबई  - 1008
पुणे मंडळ 254
कोल्हापूर मंडळ 37
अकोला मंडळ 34
नागपूर मंडळ 26
जिल्हानिहाय आकडेवारी 
अकोला - 3
बीएमसी -  132
बुलढाणा - 2
केडीएमसी 2
मीरा-भाईंदर 17
नागपूर 6
नाशिक 1
नवी मुंबई 1
पीसीएमसी 3
सीएमसी 38
रत्नागिरी 1
ठाणे 2
वसई-विरार 1
राज्याबाहेरील 1
इतर -
एकूण 1574
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours