मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहेत. मात्र, या काळात काही लोक टिकटॉक,फेसबुक,ट्विटर व अन्य सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवा पसरवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध राज्यात पोलिसांच्या सायबर शाखेने कठोर कारवाई केली आहे. पोलिसांना आतापर्यंत 161 गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हेगार व समाजकंटकांना पकडण्यासाठी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय करत आहे. तसेच टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours