मुंबई, 10 मे: राज्यासह मुंबईतील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रविवारी कोरोना व्हायरसमुळे आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात कोरोनामुळे सातव्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 7 पोलिस कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यात त्यात मुंबईत 5 तर पुणे, सोलापूर आणि नाशिक येथील एक-एक पोलिस कर्मचारीचा समावेश आहे.
उपपोलिस निरीक्षक सुनील दत्तात्रय कलगुटकर यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील विनोबा भावे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours