ओबीसी क्रांती मोर्चा चे मुख्यसंयोजक. अध्यक्ष संजय मते मागणी
भंडारा ..कोरोना वाँयरस आशा वर्करांना कोरोना संकट काळात केलेल्या अतिरिक्त व जोखमपुर्ण कामाचा प्रतिदिन200रूपये भत्ता देण्यात यावा अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे

निवेदनात पुढे म्हटले आहे की देशात आलेल्या कोरोनाच्या माहामारी काळात कोरोना संक्रमित  व बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या शोध घेऊन त्याची प्रशासनाला दैनंदिन माहिती सादर करणे ,त्यांना होम क्वारंटाईन करून ठेवणे व त्याची निगराणी ठेवणी अशा विविध प्रकारची कामे आशा वर्करकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी आपल्या जिवाची व परिवाराची पर्वा न करता ही कामे जोखीम पणे बजावली त्यामुळे प्रशासनाला कोरोनावर मात करणे सोयीचे व संभव झाले. परंतु या कोरोना योध्दांना त्यांच्या जबाबदारी चा कोणत्याही मोबदला शासन प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही
त्यामुळे त्याच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होत आहे. तरी जिल्हा प्रशासनाने आशा वक्तेरांची जोखीमपुर्ण कामाची दखल घेऊन त्यांना प्रतिदिन 200रुपये कोरोना भत्ता देण्यात यावा असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक।अध्यक्ष संजय मते  भंडारा न प .सदस्या जयश्री बोरकर ,संयोजक सुखराम देशकर, आशा वर्कर सुनिता डाकरे , महानंदा बसेशंकर, महेश जगनाडे ,ओबीसी क्रांती मोर्चा वक्ते राजेश जी ईसापुरे उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours