रीपाेटर... संदीप क्षिरसागर

नाशिक येथून आलेल्या लाखनीच्या तरुणाचा अहवाल आज १८ रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 
               हा तरुण राजेदहेगाव येथे क्वारंटाईन होता. आज नवीन रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ४ वर पोहचली आहे. यातील एक रुग्ण बराही झाला आहे. आतापर्यंत शांत असलेल्या भंडारा जिल्ह्यात आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे. दोन दिवसात जिल्ह्यात तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे हे रुग्ण पुणे, मुंबई आणि अन्य रेड झोन म्हधूनच आलेले आहेत.
आज १८ मे रोजी जिल्ह्यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. 
              हा १९ वर्षीय तरुण नाशिक येथून कोणतीही परवानगी न घेता ट्रक ने निघाला. तो लाखनी येथील रहिवासी आहे. १४ ला तो भंडारा सीमेवरील चेकपोस्ट येथे पोहचल्यानंतर त्याला राजेदहेगाव येथील वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले होते. 
            १५ ला त्याच्या घशातील नमुना पाठविण्यात आला व आज १८ रोजी हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याचे जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन यांनी सांगितले. या नव्या रुग्णामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ झाली आहे. तर यातील एक कोरोनामुक्त झाला आहे
जनतेनी स्व:ताची व आपल्या परीवाराची काळजी घेने, विना कामानी घराबाहेर पडु नये, सार्वजनिक ठीकानी थुंकु नका बाहेर पडतांनी चेह-याला मॉस्क, कीवा स्कार्फ़ लावुन बाहेर पडावे, समोर येनारी परीस्थितीला लोकांनी घाबरु ऩये  लोकानी घबरदारीचे उपाय घ्यावे असे आव्हान केले
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours