पुणे, 20 मे: राज्यात मुंबईसह पुण्यात कोरोनाने कहर केला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मंगळवारी 10 जणांचा मृत्यू झाला, यापैकी 8 कोरोना रुग्ण पुण्यातील तर 2 पिंपरी चिंचवडमधील होते. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या 226 वर पोहोचली आहे.

मंगळवारी जिल्ह्यात 193 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4370 वर पोहोचला आहे.  त्याचबरोबर 110 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे पुण्यातील बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 1910 झाली आहे. पिंपरी चिंचवड मधील 132 रुग्णही बरे झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी, कुठे किती रुग्ण

– पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 4370

– पुणे शहरातील रुग्णांची संख्या : 3,517

– पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या : 199

पुणे ग्रामीण रुग्णांची संख्या : 100

पुणेकरांसाठी लॉकडाऊनचे वेगळे नियम..

लॉकडाऊन 4 ची केंद्र आणि राज्याची नियमावली जाहीर झाल्यानंतर पुण्यात आता केवळ 3 टक्के क्षेत्र हे प्रतिबंधित उरलं आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकाने, व्यवसाय सुरू व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मॉल, रिक्षा, कॅब, बसेस केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा हे बंदच राहणार आहेत.

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट क्षेत्रात।मात्र फक्त जीवनावश्यक सुविधा सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरेलू कामगारांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रमुख रस्ते ,चौक सोडून काही ठिकाणी पथारी व्यवसाय करण्यासही मुभा देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours