मुंबई : देशात आज तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करताना केंद्र सरकारने दारुची दुकानं आणि पानाची दुकानं सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. मात्र, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन असणाऱ्या ठिकाणीच ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप राज्याकडून निर्यण घेण्यात आलेला नाही. त्यामुळे तळीरामांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने सुद्धा बंद करण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल येणे बंद झाले. परिणामी दारुच्या दुकाने सुरू करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यानुसार केंद्राने परवानगी दिली आहे.
या लॉकडाऊन काळात राज्य सरकारने काही गोष्टींमध्ये सुट दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. यात रेड झोनसाठी अतिशय कमी तर ग्रीन झोनसाठी सर्वाधिक सुट देण्यात आली आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours