मुंबई, 2 मे : सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कोट्यवधींच्या ठेवी संकटात आल्या असून खातेदारांना मोठा फटका बसला आहे. गुरुवारी रात्री रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीकेपी सहकारी बँक गेल्या काही वर्षांपासूनच अडचणींचा सामना करत होती. बँकेचा तोटा वाढल्याने रिझर्व्ह बँकेने 2014 सालीच या बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते. त्यानंतर ठेवदारांकडून बँकेचा तोटा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत होती. मात्र आता बँकेचा परवानाच रद्द झाल्याने बँकेतील 11 हजार 500 ठेवीदार व 1.20 लाख खातेदारांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने वृत्त दिलं आहे.
रिझर्व्ह बँक 2014 पासून सातत्याने बँकेवरील निर्बंधांना मुदतवाढ देत आहे. आता अलिकडील मुदतवाढ 31 मार्चला देण्यात आली. ती 31 मे रोजी संपणार होती. त्याआधीच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. बँक सध्या सहकार विभागाच्या प्रशासकांच्या नियंत्रणात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours