क्राईम रीपोटर.. संदीप क्षिरसागर 
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील घनदाट जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असलेल्या पोलिस पथकावर नक्षलवाधांनी हल्ला केला.यामध्ये पोलिस उपनिरीक्षक आणि, एक जवान शहीद झाला. सोबतच गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाचे तीन जवान जखमी झाले असुन त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर वैधकीय उपचार सुरु आहे 

 नक्षलवाधांच्या या हल्यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने (30) व शिपाई किशोर आञाम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस स्टेशन अंतर्गत आलदंडी , गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असुन, एकाची प्रकुती गंभीर आहे

आज दीनांक.. (17-5-2020)
ला सकाळी 7 वाजेच्या सुमारास शीघ्र कूर्ती दल व सी -60 पथकाचे जवान आलदंडी -गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी अगोदर भुसुरुंग स्फोट घडवुन लगेच गोळीबार केला, पोलिसानीही गोळीबाराने नक्षलवाधांना प्रत्युत्तर जिले. माञ यात गोगंलू ओक्सा, राजु पुसली व दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकुती गभीर आहे  

शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी 2 वाजे हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे

शहीद धनाजी होनमने हे पंढरपुर जिल्यातील पुलजु येथील मुळ रहीवासी होते. ते साडेतीन वर्षापासुन भामरागड येथील शीघ्र कूर्ती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हनणुन कार्यरत होते. शहीद किशोर आञाम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहीवासी आहेत  

2 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनुर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सूजनक्का हीला कठंस्थान घातले होते. तीच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी जागोजागी पोस्टर लावून 20 मे रोजी जिल्हा बंदचे आव्हान केले होते. या बंदच्या पाश्वभुमीवर नक्षल्यांनी हींसक कारवाया करणे  सुरु केले आहेत, ही घटना घडल्याने पुन्हा एकदा गडचिरोली सह राज्यात खळबळ उडाली आहे, गेल्या वर्षी 1 मे रोजी नक्षल्यानी नाल्यामध्ये भुसरंग स्फोट घडवुन आनला होता त्या हल्यामध्ये एकुन  19  जवान शहीद झाले होते
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours