रीपाेटर.... संदीप क्षिरसागर

भंडारा: ..पोलीस उपनिरीक्षकाला ‌कोरोणाची लागण अड्याळ पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी क्वाँरंटाईन पोलीस स्टेशनच्या गेट. ला लावले कुलूप
 पवनी : भंडारा जिल्ह्यात पुन्हा दोन नविन कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण सापडले असुन यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्याने पोलीस विभागात खळबळ निर्माण झाली आहे पवणी तालुक्याच्या सिमेवर आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कोरोना ची लागण झाली असावी असा अंदाज आहे.‌जिल्ह्यामध्ये शुक्रवारी नव्याने आढळलेल्या दोन रुग्णामुळे जिल्ह्याची एकुण कोरोना पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या २६ वर पोहचली आहे. या संदर्भातील माहीतीनुसार जिल्ह्यातील अड्याळ‌ पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले हे पोलीस निरीक्षक पवणी च्या सिमेवर कार्यरत होते या सिमेवरुन जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळी आलेल्या तिघांचा कोरोना चाचणी अहवाल पाँजिटीव्ह आलाय त्यापैकी एक साकोली तालुक्यातील रुग्ण हा ३६ ता. पाँजिटीव्ह आल्यानंतर दरम्यान कार्यरत असलेल्या पोलीस अधीकारी आणी कर्मचारी यांना लगेच शिंदेवाही येथे अलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांच्या घश्याचा स्वँब तपासनीला पाठवीला होता यापैकी एक पोलीस निरीक्षकाचा अहवाल पाँजिटीव्ह आला तर दुसर्या पोलीस निरीक्षकाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. या नंतर अड्याळ पोलीस स्टेशन च्या गेट ला कुलुप लावण्यात आले पोलीस निरीक्षक सिमेच्या चौकीवर कार्यरत असतांना बरेचदा कामानीमीत्त अड्याळ पोलीस स्टेशन ला आले होते. त्यामुळे किती कर्मचारी,अधीकारी त्यांच्या संपर्कात आले यानुसार हाय रिस्क लोकांची यादी तयार करुन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाईल. दुसरा कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण हा लाखांदुर तालुक्यातील असुन तो देखील कोरंटाईन सेंटर मध्ये होता आतापर्यंत १६५२ लोकांचे घश्यातील नमुने तपासनीसाठी पाठवीले होते. त्यापैकी १४६२‌ अहवाल निगेटीव्ह आले असुन २६ अहवाल पाँजिटीव्ह आले आहेत १६४  अहवाल अजुनही अप्राप्त आहेत सध्या आयसोलेशन वार्डमध्ये ४१ व्यक्ती भरती आहेत. १ कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण बरा झाला असुन २५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours