मुंबई :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद यांनी थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रात्री साडे दहाच्या सुमारास ही भेट झाली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सोनू सूद यांना घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबत होते. सोनू सूद यांनी विस्थापित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी खूप मदत केली होती. त्याच मदतीवरून संजय राऊत आणि काही शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजप हा सोनू सूदचा बोलविता धनी आहे असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत सोनू सूदने त्यांना तो करत असलेल्या कामाची माहिती दिली. संजय राऊत आणि सोनू सूद यांचा जोरदार सामना रंगला होता. त्यानंतर आज समेट झाल्याचं बोललं जातं. या भेटीपूर्वी सोनू सूद यांनी मराठीतून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.


स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं. असं त्यांनी म्हटलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours