मुंबई, 08 जून : एकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट असताना, च्रकीवादळानंही राज्याचं बरंच नुकसान केलं. मात्र या सगळ्यातही मान्सूनच्या आगमनाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी धडकलेल्या निसर्ग च्रकीवादाळामुळं अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. त्यामुळं येत्या दोन-तीन दिवसांत मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतात,असे हवमान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं 10 जूनपर्यंत तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
तर, येत्या 48 तासांत बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर, चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच मान्सूनसाठी पुन्हा पोषक वातावरण निर्माण होईल आणि मान्सून पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यासाठी अरबी समुद्राच्या आकाशात पुन्हा आद्रता वाढीस लागणे गरजेचे आहे, असंही हवामान खात्यानं म्हटलं होतं. पोषक वातावरणामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तळकोकणातून मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महाराष्ट्रात साधारणपणे 10 जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 9 ते 11जूनपर्यंत ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 10 ते 11जून रोजी पाऊस गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल होऊ शकतो. तर, बिहारमध्ये 15 ते 20 जून रोजी धडकण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये 15 तर दिल्लीत 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours