आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत त्यात मुखत्वे पदोन्नती, सेवाजेष्ठता संदर्भातील प्रश्न , तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांचे कार्यालयीन प्रश्न सोडवण्यासाठी च्या मागणीचे , महाराष्ट्र राज्य जनआरोग्य कर्मचारी महासंघ या संघटनेद्वारे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य प्रसाशकीय अधिकारी यांना निवेदन देणात आले . आरोग्य विभागातील आतांत्रिक वर्ग तीन पदे हे वर्ग चार पदांच्या तुलनेत कमी प्रमाणात मंजूर आहेत त्या कारणाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना पदोन्नती च्या पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आरोग्य विभागतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना पदोन्नती साठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे कर्मचारी यांना एकाच पदावर वर्षानुवर्षे काम करावे लागत असल्याने त्यांची कुचंबणा होत आहे , चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पैकी बहुतांश कर्मचारी हे पदवी पदव्युत्तर पदवी व विशेष शैक्षणिक अहर्ता धारक आहेत , परंतु उपसंचालक कार्यालय येथील दप्तर दिरंगाई मुळे  आणि वर्ग 3 ची पदोन्नतीने भरावयाची पदे कमी असल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे , त्यामुळे पदोन्नती च्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून , महाराष्ट्र राज्य जण आरोग्य कर्मचारी महासंघ या संघटनेतर्फे , 

1)बहुऊद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) वर्ग 3 या पदाच्या परिक्षेस  उपसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी यांना पात्र करण्यात यावे

 2) शैक्षणिक अहर्ता नुसार पदोन्नती देण्यात यावी, 

३) निम्न पदावरील कर्मचारी यांना पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून वर्ग 3 मधील काही पदांवर  100% पदोन्नती  देण्यात यावी.

 या मागण्यांचे निवेदन देण्यात आले व सोबतच विभागीय सेवाजेष्ठता मध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत ही बाब पण लक्षात आणून दिली. 

निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष , गणेश निखाडे , राज्य सचिव खंडेराव चिलगर , प्रमुख मार्गदर्शक गौरीशंकर मस्के , सूर्यभान कलचुरी , सुरज परदेशी , हरिदास कुरंजेकर , शेखर बेहुनिया विभागीय अध्यक्ष गणेश मळघणे अधिपरीचारक लोकेश कळंबे  जिल्हा अध्यक्ष, बबन मानतुटे, उपाध्यक्ष जगदीश पाटील महिला प्रतिनिधी मंगला ठोंबरे, मंदा मेश्राम , तसेच वासुदेव तुरणकर लोकेश गोटेफोडे , सागर राठोड , कोमलसिंग राठोड, महेश पांडे, सुषमा राघोर्ते, विलास चोपकर, सुनंदा गावंडे, श्रीमती ढेंगे, चंदा सरीआम , हेमलता कनोजिया , निलय गणवीर , महेश गाडेकर, हनुमंत गुट्टे, लोमेश गजभिये , अभय रमतकार, चंदन बटवे, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours