तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

भंडारा:- प्रतिकुल परिस्थिताचा सामना करून शिक्षणाबरोबर सुसज्ज व योग्य प्रशिक्षकांच्या माध्यमातुन क्रिडा  क्षेत्रात उडी घ्यावी. आज स्पर्धेच्या युगात वावरत असतांना व जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यसनमुक्त होणे आवश्यक आहे. योग- प्राणायामाबरोबर व्यायाम करावे. कारण विविध आजारावर विजय मिळविण्याकरिता महत्त्वाचे आहे. त्यामुळे शरिर सदैव तंदुरुस्त राहत असते. तसेच कुस्ती हा खेळ मैदानी व मर्दानी आहे. त्यामुळे शारिरीक, मानसिक, बौध्दीक विकास होत असते. या खेळात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्ग सुध्दा सक्रिय सहभाग घेत आहेत. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने प्रतिस्पर्धी पहेलवानावर विजय मिळवावे. या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घ्यावे. 



म्हणून शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनी पहेलवानांनी कुस्ती खेळाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करून जिल्ह्याचे नाव लौकिक करावे. असे प्रतिपादन भंडारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांनी केले. 

          ते क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या वतीने शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुलनात आयोजित तालुकास्तरिय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२३-२४ च्या उध्दघाटन प्रसंगी बोलत होते. 



         शालेय कुस्ती क्रीडा  जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरिय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे उध्दघाटन भंडारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत ईलमे, राष्ट्रीय पंच अशोक बन्सोड, भंडारा जिल्हा तलवारबाजी  असोशिएशनचे निशिकांत ईलमे, शारीरिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बिरणवार, बेनीलाल चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

            उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैटची पुजा करून कुस्तीचे उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी प्रज्वल शहारे विरूध्द पियुश वंजारी, उन्नती पाटील विरुध्द प्रियंका जगनाडे यांच्यात उद्धाटनीय सामना घेण्यात आला. 

       पुढे म्हणाले पूर्वी मातीत कुस्ती खेळल्याने कुस्तीपटूला जोश व प्रोत्साहन मिळत होते मात्र आता कुस्तीची स्पर्धा ही मॅटवर होत असते कारण कोणत्याही खेळाडूंना दुखापत होऊ नये हा या मागचा उदेश आहे. त्याचबरोबर कुस्तीगीर विद्यार्थी- विद्यार्थीनीं योग- प्राणायामाबरोबर व्यायाम व प्रौष्टीक आहार घ्यावे. खेळाडूंनी कोणत्याही व्यसना पासुन दुर रहावे. तसेच बाल वयात मोटार सायकल चालवू नये. व आपल्या पाल्याकडे पालक वर्गांनी जातीने लक्ष द्यावे असेही मत डॉ. अशोक बागुल यांनी व्यक्त केले. 

        तसेच उपस्थित मान्यवरांनी कुस्तीपटू व नवनवीन पहेलवानांना कुस्तीचे नियम व विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. 

         त्याप्रसंगी कुस्तीचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच अशोक बन्सोड यांनी कामगिरी बजावली आहे. 

          त्यावेळी तालुकास्तरिय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील ५० च्यावर कुस्तीगीर मुले-मुलींनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यापैकी फ्रि स्टाईल व ग्रिकोरोमण मध्ये अशाप्रकारे निवड करण्यात आली असून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुलनात सप्टेंबरला होणार आहेत.

      विजयी कुस्तीगीरांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय कुस्तीगीर पंच अशोक बन्सोड, जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा शिक्षक व आई- वडिलांना दिले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बिरणवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार क्रिडा शिक्षक मनिष मोहरील यांनी मानले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुपेंद्र आकरे, जिवन कावळे,‌ अंकित भगत, विलास पराते, डी.बी. टेकाम, उमेश कुथे, वाडिभस्मे, देवेंद्र वंजारी, प्रतिक घुले, अभय सार्वे, जग्गू आप्तुरकर व तालुक्यातील विविध शाळेतील क्रिडा शिक्षक, कुस्तीगीर विद्यार्थी- विद्यार्थीनीं तसेच पालक वर्गांनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours