भंडारा: शहर::- धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडारा, गोंदिया च्या वतीने रविवार दिनांक २७ सकाळी ११.३० वाजता स्पेक्ट्रम अॅकेडमी, साईप्लाझा हॉटेल जवळ, राजस्थानी भवन समोर भंडारा येथे विद्यार्थी करिअर मार्गदर्शन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


          शैक्षणिक, व्यावसायीक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व करिअर समुपदेशन तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पेक्ट्रम अॅकेडमीचे संस्थापक अध्यक्ष राजेश टिचकुले राहतील. उद्घाटक भंडारा रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, इंटर अॅक्टीव्ह अॅकेडमीचे संचालक गुणवंत घोडे, तज्ञ मार्गदर्शक  स्पेक्ट्रम अॅकेडमीचे संस्थापक अध्यक्ष राजेश टिचकुले, स्पेक्ट्रम अॅकेडमी प्रा. रामटेके, लेखाधिकारी डोणे, साकोली नायब तहसीलदार अनिता गावंडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर बोरशे, सामाजिक कार्यकर्ते भंडारा येथील नेत्रतज्ञ डॉ. विजय रोकडे, एफ. सी. आय. सदस्य राजकुमार मरठे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

        तरी जिल्ह्यातील धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा भंडारा, गोंदिया च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्याकरिता शैक्षणिक, व्यावसायीक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर समुपदेशन तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळ्याला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेश घोडे व धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा भंडारा, गोंदियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.........बातमी संपर्क करा सचिन क्षिरसागर...

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours