महात्मा ज्योतिबा फुले मोहगाव(देवी) हायस्कूल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायदा 2013 विषयी जनजागरण कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजू बांधते हे होते.कार्यक्रमाला बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे युवा कार्यकर्ता नितेश बोरकर उपस्थित होते यावेळी लंगर सोडवणे, आपोआप  होम पेटणे हातावर पेटता कापुळ खाने असे अनेक वैज्ञानिक चमत्कारिक प्रयोग करून दाखवून त्यामागचे सत्य कारण सांगण्यात आले .जगात दैवी चमत्कार नाही दैवी चमत्कारावर विश्वास न ठेवता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि पास व्हावा असे आवाहन केले.तसेच जादूटोणाविरोधी कायदा 2013 ची सविस्तर माहिती विष्णुदास लोणारे यांनी दिली या कार्यक्रमाला श्री वैद्य, एच डी पडोळे, शिखा सोनी, एस बी कोचे, एम एस वाघमारे, एच आर सिंधपुरे ,एच आर भडाके यांनी सहकार्य केले.






Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours