रिपोर्टर लिपट वाघमारे

भंडारा:- जिल्हा परिषद आरोग्य विभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी बुट्टी व उप आरोग्य केंद्र कोका (जंगल)च्या वतीने दहावा आंतरराष्ट्रिय योग दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के वाहाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा योग शिक्षक विलास केजरकर, योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी खरकाट ( कुथे), सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. नंदा मुस्कारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

       यावेळी योग शिक्षक विलास केजरकर, योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संपूर्ण प्रोटोकॉल योग साधक-साधिका कडून करवून घेतला.

        उपस्थितांचे सामुहिक स्वागत करण्यात आले. व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या व्याधीमुक्त व्हायचे असल्यास योग प्राणायाम करणे आवश्यक आहे असे मत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के वाहाणे यांनी व्यक्त केले. तर उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व व योगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती निंबार्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार के. एन. राऊत यांनी मानले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोनाली उके, निखिल भोयर, नत्थू सेलोकर, घनशाम चोपकर, मंगला आप्तुरकर, वर्षा रामटेके, ज्योत्स्ना मेश्राम, कोमल लांजेवार, सरिता केवट, जितेंद्र वाट, पायल मोहरकर, क प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर व रूग्ण, महीला -पुरूष योग साधकांनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours