राज्यशासनाने मृतकाच्या कुटुंबियांना २५ लाख तर जखमीच्या कुटुंबाला १५ लाख तात्काळ द्यावे 

  खा.डॉ.प्रशांत पडोळे

     चीचटोला, आंधळगाव,डोंगरगाव येथील घडलेली घटना अत्यंत दुःखद

                                                  प्रिंस राजकुमार दहेकर रिपोर्टर 

 

      भंडारा:- मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील महिला डोंगरगाव येथे भात रोहनी करायला नेहमीप्रमाणे गेल्या असल्यामुळे विज पडल्यामुळे दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तेथील काही महिला तिन जखमी आहेत. त्यात

आशा सुरेश सोनकुसरे, कलाबाई सुखाजी गोखले यांचा जागीच मुत्यु झालेला आहे. तर जिभकाटे कुटुंबियांच्या 2 महिला जखमी आहेत. साडे चारच्या सुमारास सदर घटना घडली. सदर घटने विषयी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी केला. नैसर्गिक आपत्ती विभागांतर्गत तात्काळ मध्ये जाहीर करावी.

        लाखनी तालुक्यातील चीचटोला येथील रहिवासी स्वर्गीय यादोराव बाळाजी दिघोरे वय ५० वर्ष यांच्यावर सायंकाळी ४ च्या सुमारास वीज पडून जागीच मृत्यू झाला. या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहो, शोक संवेदना व्यक्त करतो.

     शासनाने सदर मृतक आणि जखमी कुटुंबियांना तात्काळ मदत करावी, असे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी यावेळी सांगितले. मृतक आणि जखमी कुटुंबियांच्या पाठीशी आहो.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours