मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी नगर परिषदेद्वारे लावण्यात आलेल्या १२१ फुटाच्या राष्ट्रीय ध्वजाचे गेल्या 9 महिन्यात राष्ट्रध्वजाचे गेल्या ९ महिन्यात राष्ट्रध्वजाचा अवमानना  केल्यामुळे नगराध्यक्ष सुनील मेंढे व न.प.मुख्याधिकारी रविंद्र जांभुळकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस चे शहर अध्यक्ष सचिन घनमोरे यांनी जिल्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .
     शहराच्या मधोमध या नगर परिषदेच्या अगदी समोरच्या भागात उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वज १७ एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे १ते १.३० वाजताच्या दरम्यान नगर परिषदेचे कार्यकारी अभियंता व त्यांचे कर्मचारी राष्ट्रीय ध्वज उतरविण्यासाठी कोणतीही उपाययोजना व सुरक्षा राष्ट्रीय ध्वजाला दिली नाही. त्यामुळे त्यांना पूर्वकल्पना होती की , झेंडा तुटून खाली पडणार परंतु नगर परिषद प्रशासनाद्वारे कोणतीही सुरक्षा केली नसल्यामुळे तिरिंग उतरविण्याचा वेळेस जमिनीवर फेकून देतात व तिरंग्याच्या अपमान करतात . तिरंगा झेंडा हा देशाची शान असून त्याचा अपमान व्हायला नको याची दक्षता नागराध्वक्ष , मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी घेणे गरजेचे होते. परंतु यांनी झेंड्याला तो मान न देता झेंड्याचा आपमान करून राष्ट्रद्रोह केला आहे.
     या राष्ट्रद्रोहाच्या कृत्याला नगराध्यक्ष सुनील मेंढे , न.प.मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे , कनिष्ठ अभियंता रवींद्र जांभुळकर हे जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाही करून जनतेच्या भावना या कृत्यामुळे दाखवलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाही करून जनतेला न्याय द्यावा , अन्यथा भंडारा शहर काँग्रेस  कमितीतर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिलयाधिकारी या पोलिस विभागाला देण्यात आला आहे . यासंबंधीचे व्हिडीओ पुरावेही भंडारा पोलिसांना देण्यात आले आहे .
   मागील ८-९ महिन्यात प्रत्येक 2 महिन्यात ध्वज फाटत असतो ध्वज फाटल्यानंतर ३-४ दिवस फडकत राहतो संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देऊनही कोणतीही दाखल घेत नाही व त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा भर चौकात अपमान होत असते याची सर्व जबाबदारी हि नागराध्यक्षांची असून यामध्ये निष्काळजीपणा करीत असल्यामुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातात .
  याप्रसंगी चंदू शहरे , विनीत देशपांडे , रिजवान  काजी , इरफान पटेल , पराग खोब्रागळे , प्रवीण कांबळे , अमित तीचकुले , सुहास गजबिये , सुरेश गोंन्नडे , कमलेश बहे ,सचिन हुमने आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours