पुणे, 25 एप्रिल : गणित सोडवता न आल्यामुळे रोहन नावाच्या विद्यार्थ्याच्या तोंडात शिक्षकानं चक्क छडी खुपसली. शिक्षकाच्या या अघोरी शिक्षेमुळं रोहन नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्याच्या रूबी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोहन जन्जीरे हा नगर जिल्ह्यातल्या पिंपळवाडी गावचा रहिवासी असून तो दुसरीचा विद्यार्थी आहे. रोहनच्या तोंडात छडी खुपसल्याने विद्यार्थ्यांच्या घशात गंभीर दुखापत झाली. रोहन हा दुसरीत शिकतो त्याच्या चंद्रकांत शिंदे या गणिताच्या शिक्षकाने रोहनला गणित न आल्याने रागात छडीच तोंडात खुपसली होती.
रोहनवर पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. रोहनवर आत्तापर्यंत तीन ते चार शस्त्रक्रिया झाल्या आहेत. कुटुंबाची परिस्थिती बेताचीच आहे.
अनेक लोकप्रतिनिधी येऊन भेटून गेले मात्र या कुटुंबाला कोणीही आर्थिक मदत केलेली नाही. हालाखीची परिस्थिती असल्यामुळं रोहनच्या पालकांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours