जिल्ह्यातील लाखनी येथील जमदाडे परिवारातील हा लग्न समारंभ होता. लग्नानंतर सभागृहाबाहेर थांबलेल्या वऱ्ह्याड्यांना ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० लोक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचालकाचे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचविण्याच्या गडबडीत ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यात हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपघातानंतर तेथील स्थानिकांनी वऱ्हाडीमंडळींना चिरडणारा ट्रक अडवला. मात्र, ट्रक चालक फरार होण्यास यशस्वी झाला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड करुन महामार्गावरची वाहतूक रोखून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.








Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours